गावाविषयी माहिती
वाघ नदी व लेंडी नदी या दोन्ही नदीच्या मध्यभागी साखरी हे महाराष्ट्र राज्यात उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील उतवड आणि बसगड (भास्करगड) च्या छायेत असलेल छोटस गाव आहे. साखरी गावात हनुमान मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २९४३ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ५, अंगणवाडी केंद्रे ८ व व्यायामशाळा२, (माध्यमिक शाळा फक्त मुलीसाठी ) कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय १ , अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक विहिरी व बंधारे, सार्वजनिक नळ योजना अशा सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात,नाचणी,वरी,उडीद,तूर,कुळीथ ही प्रमुख पिके घेतली जातात. या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते, साखरी ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अनेक लाभ्यार्थ्याना शौचालय उपलब्ध करून शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ८ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
साखरी गाव आज मोखाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.